Sunday, 19 February 2017



भक्तनिवास निर्माण कार्य



  आवाहन 


                   'श्री क्षेत्र आळंदी - श्री क्षेत्र श्रद्धासागर' हा अनुबंध अखंड राहावा,वारकर्‍यांची निवास व्यवस्था व्हावी,विध्यार्थ्यांकरिता आध्यात्मिक शिक्षणाची सोय व्हावी,अशा उदात्त हेतूने पुण्यसलीला इंद्रायणी मातेसमीप सिद्धबेट परिसरामध्ये ( आळंदी देवाची येथे ) ६ गुंठे भूखंड खरीदी करून 'श्री संत वासुदेव महाराराज धर्मशाळा'उभारण्याचा संकल्प श्री संस्थेने केला आहे.श्री ज्ञानराज माऊलींच्या कृपेने,श्री महाराजांच्या आशीर्वादाच्या पाठबळाने व आपण समस्त भक्तराजांच्या सहकार्याने हा सत्य संकल्प सिद्धीस जाईल व या 'ज्ञानतीर्थावर'श्री संत वासुदेव महाराजांची ही भव्य वास्तु अल्पावधीत पूर्ण होईल,असा संस्थेला विश्वास आहे.

या ठिकाणी उभारल्या जाणार्‍या - भव्य हॉल,यात्रेकरूंसाठी सर्व सुविधांनी युक्त खोल्या,प्रशस्त भोजन कक्ष,स्वतंत्र व सुसज्ज्य स्वयंपाक गृह,पार्किंग व भक्तनिवास.

या सेवकार्याकरिता हस्ते - परहस्ते देणगी रूपाने यथाशक्ती  मदत करावी,ही नम्र विनंती .

( भक्तनिवास निर्माण कार्य करतेवेळी आपण आपली देणगी देऊन एक खोली आपल्या करिता आरक्षित करू शकता.सविस्तर माहिती करिता संस्था प्रशासनासोबत संपर्क करावा )