श्री संत गजानन महाराज ( शेगाव ) यांनी आपल्या योगसामर्थ्याने सजल केलेली विहीर अकोली जहागीर,ता.अकोट जि.अकोला (महाराष्ट्र-४४४१०१)
श्री संत गजानन महाराज यांचे पट्टशिष्य श्री भास्कर महाराज
श्री संत गजानन महाराज यांनी आकोलीच्या रानातील सर्वे नं ५२ मधील सजल केलेली विहीर
श्री संत गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर
श्री क्षेत्र अकोली जहागीर (शेत सर्व्हे नं ५२)
सदर विहीर आता श्री गजानन महाराज संस्थान शेगावची अधिकृत शाखा आहे.
अकोट - अंजनगाव मार्गावर अकोट वरून अकोली जहागीर हे गाव ११ कि.मी. अंतरावर आहे.गावाच्या पश्चिमेस २ फर्लांग अंतरावर अकोली जहागीर ते अकोलखेड या मार्गावर श्रींची विहीर आहे.
अकोट - अंजनगाव मार्गावर अकोट वरून अकोली जहागीर हे गाव ११ कि.मी. अंतरावर आहे.गावाच्या पश्चिमेस २ फर्लांग अंतरावर अकोली जहागीर ते अकोलखेड या मार्गावर श्रींची विहीर आहे.
विहीर परिसरातील श्री गजानन महाराज व भास्कर महाराज या गुरु शिष्यांचे मंदिर
संगणीकृत सातबारा
अकोली जहागीर शेत सर्वे न ५२ ( गट न ३५० ) चा सात बारा.या मध्ये श्री गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर अशी नोंद शासकीय दप्तरी आहे .
श्री संत गजानन महाराजांनी आपल्या योगसामर्थ्याने श्री भास्कर महाराज (जायले) यांच्या अकोली जहागीर येथील शेत सर्वे ५२ च्या कोरड्या विहिरीला पाणी लावले .या विहिरीचे संतकवी दासगणू महाराज विरचित 'गजानन विजय 'ग्रंथात वर्णन पुढील प्रमाणे आहे ....
'माध्यान्हीच्या समयाला | अकोली गावापाशी आला |
हा योग योगेश्वर साधू भला | श्री गजानन महाराज ||८६|| (अ.५)
आकोली गावाजवळ श्री गजानन महाराज आले
'त्या अकोलीच्या शिवारात | जलाचे दुर्भिक्ष अत्यंत ||९२|| (अ ५ )
देवाही अकोली | पाण्यावाचून त्रस्त झाली ||११७|| ( अ.५)
अश्या प्रकारे अकोली जाहागीरचा स्पष्ट उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथात आहे.
त्याच प्रमाणे श्री गजानन प्रार्थना स्त्रोत्रात ....
'अकोलीच्या रानात | सर्व्हे नंबर बावन्नात |
एका शुष्क गर्दाडाप्रत | बनविली तुम्ही पुष्करणी ||८३ ||
असा स्पष्ट उल्लेख अकोली शेत सर्व्हे नं ५२ चा आहे .
" याते असत्य मानल्यास | सुखाचा तो होईल नाश |
भोगीत राहाल संकटास | वरचे वर अभक्तीने ||१७४|| (श्री ग.प्रा.स्त्रोत्र )
ही विहीर आता श्री गजानन महाराज संस्थान शेगावची अधिकृत शाखा आहे.त्रिभूवनैक पवित्र अशा श्री तीर्थ पुष्करणीच्या (विहिरीच्या) श्री तीर्थाचा लाभ दूरदूरचे भाविक भक्त घेवून व्याधी मुक्त होत आहेत .या अकोलीच्या विहीर परिसराचे सुशोभीकरण झाले असून याच शेतात श्री गजानन महाराज व त्यांचे पट्टशिष्य भास्कर महाराज यांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.या स्थळी श्रींच्या अनुभूतीची प्रचीती आल्याचा असंख्य भक्तांचा अनुभव आहे.
विहिरीविषयी दोन शब्द.... ऐतिहासिक संदर्भ
श्री संत गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर शेत सर्वे नंबर ५२ जीर्णोद्धार
योगियांचे राजे सद्गुरु गजानन महाराज यांनी १८७८ साली
अकोली जहागीर येथील भास्कर कर्ताजी पाटील जायले यांच्या शेत सर्वे नंबर ५२ मधील १२
वर्ष कोरडी असलेली विहीर आपल्या योग सामर्थ्याने सजल केली. सदर
विहीरीच वर्णन शेगाव संस्थान प्रकाशित "श्रीगजानन विजय ग्रंथ" लेखक दासगणू महाराज यांनी अध्याय ५ मध्ये सचित्र केलेलं आहे. या
विहिरीचा वंशपरंपरागत मालकी हक्क हा गुरुवर्य वासुदेव महाराज यांच्याकडेच आलेला आहे. त्यावेळी
अकोट येथे तालुक्याच्या ठिकाणी एस.डी.ओ.आर.आर.करकरे साहेब आलेत. त्यांनी ह्या विहिरी विषयी लोकांकडे विचारणा केली असता
लोकांनी शेत सर्वे नंबर ५२ मध्ये अकोली गावाजवळ ही विहीर आहे असे सांगितले. करकरे
साहेब हे ती विहीर पाहण्यासाठी अकोली येथे भास्कर महाराज यांच्या शेतात गेले त्यांनी
त्या विहिरीची पाहणी केली. तिथून ते अड्गावी भास्करनगर येथे गुरुवर्य वासुदेव महाराज
याच्या भेटीला गेले आणि सांगितल कि "महाराज, विहीर
खूप खचलेल्या अवस्थेत आहे, आपण तिचा जीर्णोद्धार केला पाहिजे". गुरुवर्य महाराज, करकरे साहेबांना घेवून अकोली जहागीर येथे आले. तिथे
गावकऱ्यांची सभा घेतली आणि सगळ्यांनी सहकार्य करण्याचे ठरविले. दिनांक
४/११/१९६३ ला भूमिपूजन केले. दिनांक २१/११/१९६३
ला जीर्णोद्धार सोहळा मोठ्या आनंदात असंख्य भक्तांच्या समवेत पार पडला. त्यावेळी
गुरुवर्य महाराजांनी प्रवचन करून सजल केलेल्या विहीरीच महात्म्य सांगितल.
पुढे श्रीसंत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या विनंतीवरून
ह्या विहिरीचा नामोल्लेख शासनदफ्तरी "श्रीसंत गजानन महाराजांनी
सजल केलेली विहीर" असा करण्यात आला आहे. सदर सजल केलेली विहीर ही अकोला
जिल्ह्यात अकोट तालुक्यात,
अकोट-अंजनगाव मार्गावरती आकोली जहागीर गावाजवळील शेत सर्वे नं.५२ मध्ये आहे.
अकोट-अंजनगाव मार्गावरती आकोली जहागीर गावाजवळील शेत सर्वे नं.५२ मध्ये आहे.