श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांचे पट्टशिष्य
श्री संत भास्कर महाराज संजीवन समाधी मंदिर अड़गांव ||बु ||
ता.तेल्हारा जि. अकोला
श्री संत भास्कर महाराज संजीवन समाधी मंदिर अड़गांव ||बु ||
ता.तेल्हारा जि. अकोला
श्री संत गजानन महाराजांनी श्री संत भास्कर महाराजांना
चै.कृ.५ ,शके १८२९,गुरुवार दि.२/५/१९०७ ला स्वहस्ते संजीवन समाधी दिली
श्री गौरीशंकर महाराज अडगावी वासुदेव महाराजांना
श्री भास्कर महाराजांचे मंदिराचे जीर्णोद्धारार्थ आज्ञा देत आहेत ...
" वासुदेव बब्बा,
नागझरीका विद्यादान कार्य छोडकर श्री भास्कर महाराज मंदिर का कार्य शीघ्र करो ..."
" वासुदेव बब्बा,
नागझरीका विद्यादान कार्य छोडकर श्री भास्कर महाराज मंदिर का कार्य शीघ्र करो ..."
श्री संत भास्कर महाराजांना वंदन करतानी श्री संत वासुदेव महाराज
मंदिर परिसरात श्रींची भावमुद्रा
श्री क्षेत्र अडगाव |बु| ता. तेल्हारा जि. अकोला येथील
श्री संत गजानन महाराजांचे पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराजांचे मंदिर आहे.
सदर मंदिर आता श्री संत गजानन महाराज संस्थान,शेगावची शाखा आहे.
प्रत्यक्ष गुरुवर्यांच्या सान्निध्यात असताना श्रींच्या अमृत वाणीतून
वारकरी शिक्षण घेतांना सर्वांगीण विकास शिबिराला उपस्थित विद्यार्थी
श्रीक्षेत्र भास्कर नगर संजिवन
समाधी जीर्णोद्धार :-
गजानन महाराज संस्थान
शेगाव येथे रामचंद्र पाटील यांच्या सांगण्यावरून "श्रीसंत गजानन महाराज चरित्र" लेखन सुरु असताना, संस्थानमध्ये वर्धा जवळील सिंधी या गावचे योगी महात्मे
सद्गुरु गौरीशंकर महाराज आलेले होते. त्यावेळी श्रीसंत वासुदेव महाराज
यांना बघितल्या बरोबर सद्गुरु गौरीशंकर महाराज यांनी उद्गार काढले ...
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTNy2ddq5Ags6RnUTzzTq2Tj7UaEueDX5sRLf99CzjuO5hnlIWNgkWw545cXrqSo50DAhf7SAQUZvSmtW1taSGD5c1OPNLNKQc4Pvq6UV1uJB7nAko-XXWB_S4rlyjfubGASEWxVI6ngI/s320/Vasude+M+Gauri+M.jpg)
"आओ वासुदेव बाबा.. आप तो भास्कर महाराज के पोते हो.. यहापे गजानन महाराज चरित्र लेखनका दसवा अध्याय लिख रहे होना.. आप शीघ्रहि अध्यापक का काम छोडकर अडगाव मे जावो और वहापे जो भास्कर महाराज संजीवन
समाधी है उसका जीर्णोद्धार करो.. मै जल्दी वहापे दर्शन करणे आ रहा
हू..". सगळ्यांना आश्चर्य वाटले. परंतु गुरुवर्य महाराज विचार करू
लागले. कि मी जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे आणि जीर्णोद्धार म्हणजे पैसा गोळा करावा
लागेल, आजपर्यंत मी कोणाला काहीच मागितले नाही मग वर्गणी कशी करावी. तेव्हा गौरीशंकर महाराज म्हटले "जनतेला माझ नाव सांगा, गरीब असो अथवा श्रीमंत ते जे काही त्यांच्या स्वेच्छेने देतील ते घ्या आणि हे मंदिरकार्य
पूर्ण करा".
तिथून गुरुवर्य महाराज हेश्रीक्षेत्र भास्करनगर अडगाव
बु. येथे आले. हे क्षेत्र म्हणजे गुरुवर्य महाराजांचे सख्खे आजोबा आणि
योगी सम्राट सद्गुरु गजानन महाराज यांचे अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य श्रीसंत भास्कर
महाराज यांच संजिवन समाधीस्थान. याच ठिकाणी
चैत्र कृष्ण पंचमी
गुरुवार यादिवशी
सन १९०७ साली सद्गुरु गजानन महाराज यांनी श्रीसंत भास्कर महाराज यांना स्वहस्ते प्रती माउलीप्रमाणे संजिवन समाधी दिली.
सन १९०७ साली सद्गुरु गजानन महाराज यांनी श्रीसंत भास्कर महाराज यांना स्वहस्ते प्रती माउलीप्रमाणे संजिवन समाधी दिली.
पुढे १९५५ साली गुरुवर्य श्रीसंत
वासुदेव महाराज यांनी संपूर्ण आमजनतेच्या आत्मोन्नतीसाठी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यावेळी ११०० संत-महंत आणि ४०००० वारकरी उपस्थित
होते. त्यावेळी स्वतः सद्गुरु जोग महाराज यांचे शिष्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी "हेचि दान देगा देवा" या अभंगावर कीर्तन केल. आणि क्षेत्राचा महिमा सांगितला
आणि हि भास्करनगरी गोर-गरीब श्रद्धावान भक्तांची आळंदी
आहे अस जाहीर केल.
श्रीक्षेत्र भास्करनगर :-
याच क्षेत्रावरून गुरुवर्य महाराजांनी
अनेक संशोधनात्मक माहिती निर्माण केली. पुढे अनेकानेक संतांचे चरित्र
लेखन याच क्षेत्रातून केले.
भक्तांची संतसेवा दृढ व्हावी याभावनेने
पाक्षिक एकादशी वारीचा नियम गुरुवर्य महाराजांनी घालून दिला आणि दर एकादशीला स्वतः
गुरुवर्य महाराज ३ तास कीर्तन करत होते. अन्नदान हा श्रेष्ठ विधी क्षेत्रात
घडावा म्हणून बारस (द्वादशी) पंगत सुरु केली. आजही ती परंपरा भाविक भक्त श्रद्धेने जोपासत आहेत.
भावी पिढीला एक आदर्श जीवन जगता याव, त्यांना त्यांचा हिताचा मार्ग
कळावा म्हणून गुरुवर्य महाराजांनी "उन्हाळी बालसंस्कार शिबीर" हा उपक्रम सुरु केला आणि अगदी
"अर्भकाचे साठी | पंते हाती धरिली पाटी ||"
यानुसार लहान मुलांना रुचेल अस
कीर्तन प्रवचन महाराज करत असत. विद्यार्थ्यांचे बोबडे बोल ऐकून
गुरुवर्य महाराजांना खूप आनंद व्हायचा.
सन २००१ पासून हे संस्थान श्रीसंत गजानन महाराज संस्थान
शेगाव यांना विलीन झाल आहे.