शताब्दी महोत्सव


श्रीं संत वासुदेव महाराज जन्मशताब्दी महोत्सव -१ मार्च २०१७



श्रींच्या मंदिर कलशासह परिसरात हेलिकॉप्टरद्वारे झालेली पुष्पवृष्टी  १ 



श्रींच्या मंदिर कलशासह परिसरात हेलिकॉप्टरद्वारे झालेली पुष्पवृष्टी  २


श्रींच्या मंदिर कलशासह परिसरात हेलिकॉप्टरद्वारे झालेली पुष्पवृष्टी  ३





TV 9 मराठी या वृत्तवाहिनीने प्रसारीत केलेले सविस्तर 

श्रींचे जन्मशताब्दी महोत्सवी वृत्त 






झी २४ तास या वृत्तवाहिनीने प्रसारीत केलेले 
श्रींचे  जन्मशताब्दी महोत्सवी वृत्त.

दिनांक ०२/०३/२०१७ वेळ सकाळी ७:४८  











श्रींचे जन्मशताब्दी महोत्सव वृत्त दै.लोकमत २ मार्च २०१७ 




श्रींचे जन्मशताब्दी महोत्सव वृत्त  दै. देशोन्नती  २ मार्च २०१७ १




श्रींचे जन्मशताब्दी महोत्सव वृत्त दै.देशोन्नती २ मार्च २०१७ २ 





दैनिक सकाळ  २ मार्च २०१७ 



दिव्य मराठी २ मार्च २०१७






शताब्दी महोत्सवादरम्यान खालील मान्यवरांचे अमृत वाणीतून कीर्तनसेवा पार पडली.





श्रींच्या निवासस्थानावरून सुरु झालेल्या नगर प्रदक्षिणेतील

 दिंडी सोहळा क्षणचित्रे 


                             दिनांक १ मार्च २०१७ हा दिवस अकोट नगरीचा एक ऐतिहासिक  आनंदाची पर्वणी देणारा ठरला.निमित्त होते ते या नगरीच आराध्य अधिष्टान

गुरुवर्य वेद शास्त्र संपन्न श्रीसंत वासुदेव महाराज यांच्या जन्मशताब्दी उत्सवाच.गुरुवर्य महाराजांनी १९५५ साली वारक-र्यांची मांदीआळी ही श्री क्षेत्र भास्कर नगर येथे जमवली होती आणि नंतर आपल्या स्वखर्चाने गावोगावी टाळ,मृदंग,वीणा याचे वाटप करून गाथा,ज्ञानेश्वरीचे विचार घरा-घरात पोहोचवले. त्याचाच आज परिणाम की गुरुवर्य माराजांच्या जन्मोत्सवाला जवळपास १०० हून अधिक गावच्या दिंड्यांनी भव्य पालखी सोहळ्याला अतीव उत्साहात हजेरी लावतात.सलग  तीन किलोमीटर लांब पालख्यांची  रांग असलेला ४ तास हा पालखी सोहळा पूर्ण अकोट नगरीतून मुख्य मार्गाने इतिहास रचत नगरप्रदक्षणेला निघतो.
                       गुरुवर्य महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर एक स्वप्न होत  ते म्हणजे जातीयवाद नष्ट होवून सगळे एका ठिकाणी गुण्यागोविंदाने यावेत अन नांदावेत.एका ताटात जेवण करून आनंदाने जगावे.
हे स्वप्न आज पूर्णत्वाला गेलं.वर्षभरात या जन्मशताब्दी निमित्ताने ३५० च्या वर पूर्ण महाराष्ट्रातील गावात गुरुवर्य महाराजांचा पालखी रथ सोहळा गेलाय त्या निमित्ताने श्री प्रत्यक्ष प्रत्येक  भक्तांच्या दारात स्वत:हून गेलेत.प्रत्येक जाती-धर्मातील भाविकांनी मोठ्या
आदराने,भाव-भक्तीने गुरुवर्य महाराजांचं पूजन केलं.या नेत्रदीपक भव्य-दिव्यं विराट अश्या जन्मोत्सवाला समाजातील सर्वच स्थरातील लोकांनी,आबालवृद्धांनी  अगदी आपल्या घरचाच हा उत्सव समजून रोज हजेरी लावली.१ मार्च २०१७ या दिवसाला संपूर्ण अकोट दिंडीमय होऊन भक्तिरसात न्हावून निघालं होत.भक्तगणांच्या डोळ्यात आनंदाश्रू  येऊन मनात एकच विचार घोंगावत होता  ' आज जर गुरुवर्य महाराज असते तर ... ' तत्क्षणी ही जाणीवही होती की गुरुवर्य महाराजांचं अस्तीत्व हे चराचरात असून ते चैतन्य रुपात सदैव भक्तांच्या सोबतच आहेत.
       
श्रीक्षेत्र श्रद्धासागर अकोट येथे सर्व दिंड्या आल्यानंतर हेलिकॉप्टर द्वारा गुरुवर्य महाराजांचे मंदिर,मंदिर परिसर तथा उपस्थित भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून श्रींच्या श्रद्धेपोटी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी ११ वाजता पासूनच महाप्रसाद वाटपाला सुरुवात करण्यात आली आणि "ओम वासुदेवाय नमो नम:"च्या गजरात गुरुवर्य महाराजांचे समाजहितपयोगी विचार घेऊन प्रत्येक वारकरी हा सुख सोहळा आपल्या डोळ्यात साठवून घराच्या दिशेने निघू लागला.श्री ह.भ.प.विठ्ठल महाराज कोरडे,आळंदी (देवाची) यांचे १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन होवून वर्षभरापासून सुरु असलेला हा अलौकिक सोहळा संस्थेला विशेष सहकार्य करणा-या भक्तगणांचे तथा सहभागी दिंड्यांच्या यथोचित सत्काराने पूर्णाहुती देवून विसावला.

श्रीकांत खवले                   





 नगर प्रदक्षिणेतील दिंडी सोहळा क्षणचित्रे 



श्रींची माया सर्वांवर मोठी | अश्वही जिथे नतमस्तक होती ||











































सेवाधारी 















श्री संत वासुदेव महाराज यांचे जीवन दर्शन होईल अशा 'फोटो गॅलरी'चे उदघाटन 
 श्री ह.भ.प.रामराव महाराज ढोक (रानायनाचार्य ) यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
श्री वासुदेवराव महल्ले, पुरुषोत्तम मोहोकर व विश्वस्त मंडळ उदघाटनीय अवलोकन करतेवेळी ....


श्रीराम कथे दरम्यान महाप्रसादाकरिता अवघ्या पाच मिनिटात २६७०००/- वर्गणी गोळा झाली.
वर्गणी गोळा करताना सेवाधारी 


 गोळा झालेली वर्गणी श्री ह.भ.प.रामराव महाराज ढोक (रामायानाचार्य)यांनी
 संस्थेचे अध्यक्ष श्री वासुदेवराव महल्ले तथा कोषाध्यक्ष श्री पुरुषोत्तमजी लाजुरकर यांना सुपूर्द केली तो क्षण 






जन्मशताब्दी निमित्त उभारलेले भव्य संतपीठ
जन्म शताब्दी निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास बसलेले भक्तगण 

श्री.ह.भ.प.रामराव महाराज ढोक (रामायनाचार्य)यांचे संतपीठावर स्वागत करतानी 
अध्यक्ष श्री.ह.भ.प.वासुदेवराव महल्ले व सर्व विश्वस्त 
श्रींच्या रथागमन प्रसंगी पाऊली खेळून आनंदसागरात डुंबून गेलेले वैष्णवजन  

श्रींच्या रथागमन प्रसंगी नगर प्रदक्षिणेस निघालेले शिस्तबद्ध दिंडी व भक्तगण   

महोत्सवनगरीत श्रींच्या रथाचे आगमन 




जन्मशताब्दी निमित्त वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रभर ५१  पारायण सोहळे करून आलेल्या
  कलशाला भक्तिभावाने नमन  करतानी संस्थेचे विश्वस्त 
श्री दादाराव अण्णाजी पुंडेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी तथा सर्व विश्वस्त





श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे संपन्न होत असलेल्या गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज जन्मशताब्दी महोत्सवाचे भव्य मंडप व संतपीठाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा