श्री संत वासुदेव महाराजांचे निवासस्थान
याच प्रासादिकेत महाराजांचा निवास असायचा
सदर निवासस्थान श्री संत वासुदेव महाराज नगर, अकोट
ता.अकोट जी.अकोला (महाराष्ट्र ) पिन ४४४१०१ येथे आहे.
या प्रासादिकेत सन १९६९ पासून २००९ (निर्वाण) पर्यंत श्रींचा निवास होता.
वरील प्रासादिकेत राहत असतांना
सदगुरू श्री संत वासुदेव महाराज यांचे वापरात असलेल्या वस्तू
सदगुरुंच्या सोबत राहण्याचे परम भाग्य लाभलेला तेथील भक्त परिवार
श्री ह.भप.श्री ज्ञानदेवराव खुशालराव गावंडे व श्रीमती कौसल्याबाई गावंडे (श्रींच्या मावशी )
यांचेकडे महाराजांचा निवास असायचा.
⇓
श्री ह.भप.श्री ज्ञानदेवराव खुशालराव गावंडे व श्रीमती कौसल्याबाई गावंडे
यांना गीताबाई हे कन्यारत्न होते.
⇓
वै.सौ.गीताबाई यांचा विवाह
⇓
श्री.माधवराव ज्ञानदेवराव मोहोकार (वारुळा ता.अकोट) यांचे सोबत झाला.
श्री ज्ञानदेवराव, श्रीमती कौसल्याबाई, वै.सौ.गीताबाई व श्री माधवराव मोहोकार
यांना गुरुवर्यांच्या समवेत राहून सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.
⇓
गीताताई यांचे दोन चिरंजीव
श्री पुरुषोत्तम माधवराव मोहोकार व
श्री उमेश माधवराव मोहोकार
यांनी आपल्या आई वडिलांचा वसा घेऊन गुरुमाउलींचे विचार,संदेश जगभर पोहोचविण्याचे बहुमोल कार्य हाती घेतले आहे. आता मोहोकार परिवार याच पवित्र सदनिकेत राहते.
श्री संत वासुदेव महाराज यांच्या ज्ञानकुंभातील पराग कण वेचताना
श्री उमेश मोहोकर श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे